¡Sorpréndeme!

आता खाद्य पदार्थावर ही टपाल तिकीट। दोन मराठी खाद्यपदार्थाचा समावेश | Lokmat Marathi News

2021-09-13 150 Dailymotion

पोस्ट विभाग दरवर्षी नवनवीन पोस्टाची तिकीटे प्रदर्शित करत असते. यावेळी भारतीय खाद्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे.पोस्ट विभाग दरवर्षी नवनवीन पोस्टाची तिकीटे प्रदर्शित करत असते. यावेळी भारतीय खाद्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. 24 खाद्यपदार्थांच्या पोस्ट तिकीटांमध्ये मोदक आणि वडापाव या पदार्थांना स्थान देण्यात आले आहे.उकडीचे मोदक हा गणेशोत्सव किंवा संकष्टी-अंगारकीला महाराष्ट्रातील घराघरात केला जाणार गोड पदार्थ आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या मनात या पदार्थाला वेगळेच स्थान आहे. उकडलेल्या तांदळाच्या पिठीत खोबऱ्याचे गोड सारण भरुन केल्या जाणाऱ्या मोदकांची चव अनेकांच्या जिभेवर रेंगाळते दुसरीकडे, वडापाव हा मुंबईतील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. अनेकांसाठी वडापाव म्हणजे एकवेळचे जेवण आहे. घड्याळाच्या काट्यावर धावताना सर्वत्र मिळणारा वडापाव कुठेही पटकन खाता येतो आणि पोटाची भूक भागवता येते.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews